मुंबई । 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीकडून कोण किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यातच आगामी लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत महायुतीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असल्याची माहिती दिली.
त्यानुसार भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 22 जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 2019 साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल असे देखील देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.