रेल्वेखाली झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वच हादरले आहे. तरुणाच्या मृतदेह अनेक किलोमीटरपर्यंत ओढत राहिला. पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला तरुणाचा मृतदेह लटकलेला पाहून लोकांनी आवाज करत ट्रेन थांबवली. त्यांनतर इंजिनमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
सोमवारी स्टेशनजवळ बसलेल्या गावकऱ्यांना रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकलेला तरुणाचा मृतदेह दिसला. इंजिनमध्ये मृतदेह अडकलेला पाहून मगरीकांनी आरडाओरडा करून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. नागिरकांच्या आवाजामुळे रेल्वे चालकाला काहीतरी अघटित होण्याची भीती वाटल्याने ट्रेन थांबवली. ट्रेन थांबली तेव्हा इंजिनसमोर तरुणाचा मृतदेह खाली लटकत असल्याचे दिसले.
रेल्वेच्या इंजिनमध्ये तरुणाचा मृतदेह अडकल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. इंजिनमध्ये अडकलेल्या तरुणाचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला. घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आता पोलीस मृतदेहाची ओळख पटत आहेत. तरुणाने हाफ जॅकेट, चेकर्ड शर्ट आणि जीन्स घातली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे.
तरुणाचा मृतदेह इंजिनसमोर कसा अडकला, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी भुडा बरातरा येथील स्टेशन अधीक्षक सांगतात की, फरुखाबादहून शिकोहाबादकडे येणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनासमोर उडी मारून तरुणाने आत्महत्या केली आहे.
इंजिनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भुडा बारत्रा-आराव दरम्यान घडली. त्यांनी सांगितले की, जेव्हा गावकऱ्यांनी इंजिनमध्ये मृतदेह अडकलेला पाहिला तेव्हा ट्रेन थांबवून ती इंजिनमधून बाहेर काढण्यात आली.