वडोदरा तलावात बुडालेल्या मुलांचा शेवटचा Video समोर

वडोदरा (गुजरात) : गुजरातमधील वडोदरामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. येथील हरणी तलावात बोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत 14 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुले होती. या मुलांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे, जेव्हा मुले गेटमध्ये घुसली तेव्हाचा आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये मुले हरणी तलाव परिसरात शिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण हा त्याचा शेवटचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी 18 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. वडोदरा येथील या घटनेत निष्काळजीपणा दिसून आला. बोटीवरील बहुतांश विद्यार्थ्यांसह शिक्षकांना लाईफ जॅकेट न घालता बसवण्यात आलं होतं.  सर्व विद्यार्थी येथे सहलीसाठी आले होते. गुजरात सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले असून ते 10 दिवसांत आपला अहवाल सरकारला सादर करतील.


क्षमतेपेक्षा जास्त मुले का बसली?

या बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले. फक्त 10 जणांनी लाईफ जॅकेट घातले होते. ज्यांनी लाईफ जॅकेट परिधान करण्यात आले होते त्यांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मात्र, जॅकेट नसलेल्या त्या मुलांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना पीएम नॅशनल रिलीफ फंडातून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.