वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 7000 रुपयांनी महागला ; आज काय आहे दर

मुंबई । तुम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या आधी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर त्याआधी आज सोने-चांदीचा दर काय आहे ते तपासा. जागतिक तसेच देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. या महिन्यातील ४ डिसेंबरला सोन्यासह चांदीच्या किमतीनीं आजपर्यंत सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते.

त्यामुळे ऐन लग्नसराईत दोन्ही धातूंनी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. दरम्यान, वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल ७,००० रुपयांनी महागला आहे. चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं तर चांदीच्या किमतीत देखील वर्षभरात १० ते १२ हजार रुपयाची वाढ दिसून येतेय.

आजचा सोने-चांदीचा दर काय?

आज 21 डिसेंबर 2023 रोजी सोने-चांदीची किंमत स्थिर आहे. बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला होता. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 380 रुपयांची वाढ झाली होती तर, चांदीच्या दरातही वाढ झाली होती. पण आज मात्र सोने-चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्यासाठी 5,775 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा 6,300 रुपये प्रति ग्रॅम आहे.

आज सोन्याचा दर काय?
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नसूने सोने-चांदीचा भाव जैसे थे आहे. आज 21 डिसेंबर रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today) 57,750 रुपये, 18 ग्रॅम 47,250 रुपयांवर आणि 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 63,000 रुपये इतका आहे.

चांदीचा भाव
आज चांदीचा भावही बुधवार प्रमाणे कायम आहे. बुधवारी मात्र चांदीच्या किमतीत 1000 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेली नाही. एक किलो चांदीची किंमत (Silver Rate Today) 78,500 रुपये आहे.