मुंबई । सोने-चांदीने वर्षाअखेरीस आनंदवार्ता दिली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सोन्या-चांदीच्या दरातील वाढीला ब्रेक लागला. शुक्रवारी (29 डिसेंबर) सोने 400 रुपयांची घसरण झाली. तर चांदीचा भाव 760 रुपयांनी घसरला.
यानंतर 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 58,135 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा एक किलोचा भाव 74,290 रुपयावर आला आहे त्यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये या वेळी दोन्ही धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
सोने दरात घसरण
गेल्या दोन आठवड्यात सोने चमकले. भाव 2700 रुपयांनी वधारले. या आठवड्यात सोने 700 रुपयांनी महागले. आता त्यात घसरण झाली आहे. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. 28 डिसेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. 29 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली.