वाघाची कातडी विक्री करण्यासाठी निघाले, मात्र त्याआधीच प्लॅन फसला, शहाद्यात वनविभागाची मोठी कारवाई

शहादा : वाघाची कातडी आणि नखांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीला वनविभागाने अटक केली. त्यांच्याकडून  वाघाची कातड व २० नग नखे जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींच्या दाव्यानुसार गुजरात राज्यातून वाघाची कातडी आणि नखांची तस्करी केली गेली होती. यानंतर शहाद्यात एका ग्राहकाला याची विक्री केली जाणार होती. वन विभागाला तीन जण शहाद्यात वाघाची कातडीसह नखे अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती होती. त्‍यानुसार वन विभागाने पोलिसांच्‍या मदतीने सापळा रचला होता.

कातडी व २० नखे जप्‍त
वन विभागाने सापळा रचून या तीन जणांना अटक केली. त्याचबरोबर ग्राहकाला देखील ताब्यात घेतल्यावर त्यांच्याजवळ असलेल्या वाघाची कातडी, २० नग नखे मिळून आली. आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.