---Advertisement---

वादळी वाऱ्याने केळी पिकांना फटका; खासदार रक्षा खडसेंनी केली पाहणी

---Advertisement---

रावेर : अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे केळी पिकांना मोठा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. खासदार रक्षा खडसे यांनी ३० रोजी प्रत्यक्ष भेट देत नुकसानाची पाहणी केली. यावेळी संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना केल्या.

रावेर तालुक्यात दि.२६ मे, रविवार रोजी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील पुरी, गोलवाडे व तांदलवाडी गावात केळी पिकांना मोठा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. खासदार रक्षा खडसे यांनी ३० रोजी स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना केल्या.

तसेच लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आश्वासन देऊन धिर दिला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment