वायरची जोडणी करत होता तरुण; अचानक… घटनेनं जळगाव जिल्ह्यात शोककळा

प्लग आणि वायर यांची जोडणी करत असताना विजेचा शॉक लागून १६ वर्षीय मुलाचा दुर्देवी  मृत्यू झाला. ही घटना पहूर येथे आज बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. दीपक सुरेश वारुळे  (वय १६) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवनगर भागात राहणाऱ्या दीपक सुरेश वारुळे  (वय १६) हा  प्लग आणि वायरची जोडणी करत असताना त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्ध हरपली. शेजारील रहिवाशांनी  त्यास तातडीने उपचारार्थ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. नजमुद्दीन तडवी, डॉ. रुपाली पाटील, परिचारिका योगिता नागरे, वैशाली पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दरम्यान उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात विधवा आई व विवाहित बहीण आहे.