वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा, आता…

xr:d:DAFe8DR0y38:2481,j:4440973134849772015,t:24040509

मुंबई : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. भाविकांना दर्शनरांगेत लिंबूपाणी आणि १ लिटर पाण्याची बाटली देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठक झाली. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांच्या शिष्टमंडळाने आषाढी वारीतील सर्व दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती.

दौंड येथील भीमा नदीकाठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. वारकऱ्यांसाठी गटविमा योजना, तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. भाविकांना दर्शनरांगेत लिंबूपाणी आणि १ लिटर पाण्याची बाटली देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.