वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी ! पेट्रोल-डिझेल झाले ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारकडून जनतेला दिलासा देण्याचा प्रयन्त केला जात आहे. अशातच मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर प्रत्येकी २ रुपयांनी स्वस्त करून सर्वांना दिलासा दिला आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच (१५ मार्च) नवे दर लागू होतील. ८ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपये कपात करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून गुरुवारी रात्री हा निर्णय जाहीर केला. नवीन दर आज १५ मार्चपासून लागू झाले आहे.

जळगावमध्ये गुरुवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.६४ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९४.११ रुपये होता. शुक्रवारपासून दोन्ही इंधनात प्रत्येक दोन रुपये कपात झाल्यामुळे पेट्रोलचा नवा दर १०५.६४ रुपये तर डिझेल ९२.११ रुपये प्रतिलिटर होऊ शकते. यात थोडा फार फरक येऊ शकतो.