---Advertisement---

विजेचा शाॅक लागल्याने तीन म्हशींचा जागीच मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

जळगाव : गावठाण जागेत म्हशी चरत असताना अचानक विजेचा धक्का लागून तीन म्हशी जागेवरच ठार झाल्या. पारोळा तालुक्यातील कंकराज येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  या घटनेत सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारोळा तालुक्यातील कंकराज येथील भैय्यासाहेब पाटील हे कंकराज शिवारात आपल्या म्हशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चारत होते. यावेळी अचानक इलेक्ट्रिक तारांचा म्हशींना शॉक लागला, यात तीन म्हशींचा विजेच्या धक्क्याने जागेवरच मृत्यू झाला.

यात शेतकरी पाटील यांचे सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment