तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. आता तंत्रविद्यानिकेतन आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. घोषणा राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
डेक्कन एजुकेशन सोसायटीद्वारा संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आपले विद्यार्थी हुशार आहेत पण आत्मविश्वास कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षण संस्था, तसेच विद्यापीठांनी उपक्रम राबवायला हवे. अशा सूचना पाटील यांनी केल्या.
पाटील म्हणाले प्राध्यपकाने कोणत्याही भाषेत शिकवावे. विद्यार्थ्यांना ते आपल्या भाषेत ऐकू येईल. असे सॉफ्टवेयर तयार करण्यात येत आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना मातृभाषेतून अधिक चांगल्याप्रकारे समजतात हे लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला आणि भारतीय संस्कृती आणि परंपरेला महत्व दिले आहे.