विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्डाच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. इयत्ता 10वी आणि 12वीची सुधारित तारीखपत्रक CBSE cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.इयत्ता 10वी आणि 12वीची सुधारित तारीखपत्रक CBSE cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. सुधारित वेळापत्रकानुसार काही पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

इयत्ता 10ची तिबेटमधील पेपर परीक्षा आता 23 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर 4 मार्च 2024 रोजी घेतला जाणार होता. तसेच, इयत्ता दहावीची रिटेल परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार होती, ती आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता 11 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे.

सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा 13 मार्चला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा मात्र 2 एप्रिलला संपणार आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत सर्व दिवस परीक्षा होणार आहे.

‘या’ संकेतस्थळांना भेट द्या
cbse.gov.in
cbse.nic.in

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10वी आणि 12वीची डेटशीट नुकतीच जारी केली आहे. त्याबरोबरच काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन डेट शीट डाऊनलोड करू शकतात. डेटशीट डाऊनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.