पारोळा : विद्यार्थ्यांनो आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण स्वतःला झोकून देवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन आदर्श कॉम्प्युटर्स आणि कोचिंग क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर बुंधे यांनी केले.
येथील नागेश्वर धाम येथे आदर्श क्लासेसच्या १२ वी कॉमर्स विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला त्यात ज्ञानेश्वर बुंधे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गायत्री परिवाराचे सेवक गोटू शिंपी यांनी संस्कृती आणि संस्कार टिकवण्यावर मौलिक मार्गदर्शन केले.
दरम्यान किसान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रशांत इंगोले प्रा. प्रशांत मेश्राम, क्लासेसच्या संचालिका योगिता बुंधे, डॉ.चेतना बुंधे, प्रफुल्ल बुंधे, रमेश बारी (बाबा), शोभा बारी, वंदना बारी, निर्मल बारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी धनश्री साळी, जयश्री चौधरी, शुभम चौधरी, मयुरी चौधरी, संजीवनी पाटील, रजनंदिणी भोसले, सचिन बोरसे, मयुर पाटील, कृष्णा पाटील, जयेश पाटील, बंटी चौधरी, विजय चौधरी, कविता चौधरी, रुपाली पाटील, गणेश चौधरी, मनोहर न्हावी यांनी परिश्रम घेतले.