---Advertisement---

आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी?, विधानसभा अध्यक्ष म्हणाले..

---Advertisement---

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे यावर निर्णय कधी? असे प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांची याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष?
मी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. राजकीय पक्षाचा व्हीप गृहीत धरण्यात यावा. कोणत्या राजकीय पक्षाचा व्हिप योग्य, याचा निर्णय देखील न्यायालयाने अध्यांकडे सोपवला आहे. योग्य चौकशी होईल. त्यानंतर निर्णय घेऊ. घटनात्मक बाबींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ.कोणता गट हा राजकीय पक्ष आहे. हे ठरलं तर दुसऱ्या गटाला पहिल्या गटाचा व्हीप लागू होणार का? यावर नार्वेकर म्हणाले, राजकीय पक्षाचा व्हिप लागू होणार. राजकीय पक्ष ठरलेल्या गटाच्या अध्यक्षांनी नेमलेला व्हीप ग्राह्य धरण्यात येईल, असे नार्वेकर म्हणाले.

न्यायालयाने भरत गोगावले यांनी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की सुनिल प्रभू हे प्रतोद होते. गोगावलेंची नियुक्ती चुकीची होती. यावर नार्वेकर म्हणाले, भरत गोगावले यांना आम्ही नियुक्त केलं नाही. आमच्या कार्यालयाने केवळ पक्षाने दिलेल्या माहितीची नोंद घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment