तरुण भारत लाईव्ह न्यूज : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यता आले आहेत. त्यांना या काळात मुंबई आणि नागपूर विधिमंडळ आवारात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चौकशीसाठी प्रकरण आचरण समितीकडे प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद, माजी मंत्री आणि सभागृहातील ज्येष्ठ नेते असूनही जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंविधानिक शब्दाचा उल्लेख केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
दिशा सालीयन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षातील सर्वच नेतेमंडळींनी विधानसभेत गोंधळ सुरू केला. अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. त्यानंतर मविआतील नेत्यांनी जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती केली होती. मात्र, अजानक जयंत पाटील यांनी उठून हा शुद्ध निर्लज्जपणा आहे, असा शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात सर्वच सत्ताधारी पक्षांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर पुन्हा अधिवेशन सुरू झाल्यावर याबद्दलचा ठराव मंजूर करण्यात आला.