विधानसभा निवडणुक! राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला नव्हे, ‘या’ तारखेला होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. परंतू, आता ही तारीख बदलण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी देवूथनी एकादशी असल्याने आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम या पाच राज्यांत निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. मात्र, आता यात थोडा बदल करण्यात आला आहे. यानुसार राजस्थानमध्ये होणाऱ्या मतदानाची २३ नोव्हेंबर ही तारीख पुढे ढकलून ती आता २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

२३ नोव्हेंबर रोजी नोव्हेंबरला देवूथनी एकादशी असल्याने मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे होत असतात. त्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केलेल्या अर्जानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.