विना नंबर वाहनातून मध्यप्रदेशातील मद्याची तस्करी; ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

शहादा : मध्यप्रदेशातुन बनावट मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेत पोलिसांनी सुमारे ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमा जप्त केला. या प्रकरणी शहादा पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाद तालुक्यातील मंदाणा- दामळदा रस्त्यावरून मध्यप्रदेशातून बनावट मद्याची अवैध तस्करी होत असल्याची माहिती  शहादा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पाळत ठेवून चिखली फाट्यावर मध्यप्रदेशातून येणाऱ्या विना नंबरच्या मॅक्स पिकअप या चार चाकी वाहनाला ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यात टॅंगोपंच कंपनीच्या मद्याच्या १८३९ बाटल्या आढळून आल्यात. ज्याची किंमत सुमारे ६४ हजार ३६५ रुपये आहे. वाहनासह सुमारे दोन लाख ६४ हजार ३६५ रुपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेड काँस्टेबल मिथुन शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादि वरुन मद्य तस्करी कराणारे आरोपी नवाजखाँ पिंजारी, संजय जोगट्या पावरा दोन्ही रा. गडदेव ता. शिरपुर जि. धुळे, शांत्या ( पुर्ण नाव माहित नाही) रा. लक्डकोट ता. शहादा व आरिफ सैय्यद रा. खेतिया जि. बडवाणी (म.प्र.) यांच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. नि. शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शना खाली पो.ऊ.नि. छगन चव्हाण पुढिल तपास करित आहेत.