पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतू भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पॅरिसला फोन केलाय. ‘विनेश तू चॅम्पियन आहेस, तुम्ही देशाचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात’, असेही पीएम मोदींनी म्हटले आहे.
महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती. तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवलं होतं. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. ऑलिम्पिक नियमानुसार, जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त होतं.
नियमानुसार, कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पृष्टी केली आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्रिय झाले आहेत. विनेश फोगटचे कौतुक करण्यासोबतच त्यांनी पॅरिसमध्ये फोनही केला. ‘विनेश तू चॅम्पियन आहेस, तुम्ही देशाचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात’, असेही पीएम मोदींनी म्हटले आहे.