भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेप्रकरणी 10 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी निर्णय अपेक्षित होता. या निर्णयाकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागून होतं. मात्र काल निर्णय झाला नाही. आता या प्रकरणातील निकाल रविवार, 11 रोजी रात्री साडे नऊ वाजता येणार आहे. डॉ. एनाबेले बेनेट एसी एससी या विनेश फोगाट प्रकरणाचा निकाल देणार आहेत.
विनेश फोगाट हीने तिला अपात्र ठरवल्यांनतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये धाव घेतली. त्यानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये तब्बल 3 तास युक्तीवाद चालला.
विनेश फोगाट या सुनावणीत व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे उपस्थित राहिली. तर हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी युक्तीवाद केला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी निकाल अपेक्षित होता. मात्र क्रीडा लवादाला या निर्णयासाठी वाढीव वेळ हवा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय रविवारी येणार आहे.
दरम्यान, वाढीव वेळ घेतल्याने विनेशला पदक मिळणार, असा याचा अर्थ काढला जात आहे.