---Advertisement---

विमानाला उशीर झाल्याने संतापला प्रवासी; थेट पायलटलाच… पहा व्हिडिओ

---Advertisement---

डिगो फ्लाइटमधील एका प्रवाशाने पायलटशी हाणामारी केल्याची घटना समोर आली आहे. साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव असून तो दक्षिण दिल्लीचा रहिवासी आहे. साहिलने अनूप कुमार नावाच्या पायलटला मारहाण केली होती.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता साहिलला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे. वास्तविक, सोमवार, 14 जानेवारी रोजी इंडिगो फ्लाइट 6E2175 चे टेक ऑफ होण्यास विलंब झाला होता. सकाळी ७ वाजता दिल्लीहून गोव्यासाठी विमान रवाना होणार होते, सकाळपासूनच प्रवासी विमानात बसले होते.

काही वेळाने विमान सकाळी साडेदहा वाजता निघणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना साडे बाराची वेळ सांगण्यात आली. यानंतर अडीचच्या सुमारास विमानाचे दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर पायलट अनूप कुमार यांनी प्रवाशांना सांगितले की, विमानाला आणखी उशीर होत आहे आणि एटीसीने अद्याप टेक ऑफची परवानगी दिलेली नाही.

https://twitter.com/i/status/1746755385313366216

यामुळे संतापलेल्या साहिलने पायलटवर हल्ला केला आणि त्याला चापट मारली. यासोबतच त्याने धमकीही दिली होती. यावेळी तेथे उपस्थित एअर होस्टेसनेही साहिलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने साहिलला पकडून अडवले. यानंतर क्रू मेंबरने सीआयएसएफला याबाबत माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment