---Advertisement---

‘विराट आयपीएल खेळणार नाही’, चाहते चिंतेत !

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नुकताच दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याने आपल्या या बाळाच्या जन्मासाठी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यानी बीसीसीआयला आधीच माहिती दिली होती. विराटला सुरुवातीच्या सामन्यांपासून बाहेर राहण्याची परवानगी दिल्यानंतर बोर्डाने त्याला संपूर्ण मालिकेतून बाहेर राहण्याची परवानगी दिली होती. अशात आता विराट कोहलीबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.

वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून माघार घेणाऱ्या किंग कोहलीच्या आयपीएल खेळण्याबाबत सुनील गावसकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. २२ मार्चपासन होणाऱ्या आयपीएलमध्ये सलामीलाच आरसीबीचा सामना धोनीच्या सीएसकेसोबत होणार आहे.

बराच काळ क्रिकेटपासून लांब राहिल्यानंतर थेट आयपीएल खेळणे कोहलीला जड जाईला का, असा प्रश्न विचारला असता गावसकर गमतीने म्हणाले, कदाचित तो आयपीएलमधून देखील माघार घेऊ शकतो, दरम्यान, या दोघांमध्ये भूतकाळात उडालेले खटके पाहता, गावसकरांनी कोहलीला मारलेला हा टोमणादेखील असू शकतो.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment