विराट कोहली बनला सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला आहे. आयसीसीने कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा सन्मान दिला आहे. 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी विराट कोहलीला ICC पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे.

गतवर्षी विश्वचषकात आपल्या जबरदस्त फलंदाजीने विक्रम करणाऱ्या कोहलीने या शर्यतीत आपले सहकारी मोहम्मद शमी आणि टीम इंडियाच्या शुभमन गिल यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. कोहलीने हा मान विक्रमी चौथ्यांदा जिंकला असून अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.