अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 वर्षांनंतर परतले आहेत. या दोघांनी 2022 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, परंतु त्यानंतर टी-20 मधून ब्रेक घेतला होता. अफगाणिस्तानविरुद्ध रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करणार असून विराट कोहलीलाही या संघात स्थान मिळाले आहे. निवड समितीच्या या निर्णयानंतर हे दोघेही या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळू शकतील असे दिसते.
रोहित आणि विराट या वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या T20 विश्वचषकात खेळणार की नाही अशी चर्चा भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून होती. याचे कारण म्हणजे दोघेही 14 महिन्यांसाठी टी-20 इंटरनॅशनलमधून ब्रेकवर होते. अफगाणिस्तान मालिकेसाठी निवडलेल्या संघावरून या दोघांचेही टी-20 भविष्य असल्याचे सूचित होत आहे.
T20 विश्वचषक खेळणार !
काही दिवसांपूर्वी, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की रोहितने टी-20 वर्ल्ड कपमधील त्याच्या भूमिकेबाबत निवडकर्त्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तो खेळला तर कर्णधार होणार की नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. जर तो उपलब्ध असेल तर तो कर्णधार असेल असे निवडकर्त्यांनी त्याला सांगितले होते. गेल्या टी20 विश्वचषकानंतर बहुतेक टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार होता. त्यामुळेच रोहितने असे सांगितले होते. रोहितसोबत विराटनेही निवडकर्त्यांना सांगितले होते की, तो T20 वर्ल्डकपसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे. साहजिकच, हे दोघेही टी-२० विश्वचषकात थेट खेळू शकत नाहीत, त्यामुळे निवडकर्त्यांनी दोघांनाही अफगाणिस्तान मालिकेत तयारीसाठी संधी दिली आहे.