मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. निकालापूर्वी राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावर होत असलेल्या टीकेलाही शिंदेंनी उत्तर दिले आहे.
निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष अधिकृतरीत्या आम्हाला दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह देखील आम्हाला दिले आहे. बहुमतही आमच्याच बाजुने आहे. लोकशाहीमध्ये बहूमतालाच महत्व असते असे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्याकडे विधानसभेत आणि लोकसभेतही बहुमत आहे असही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला होता आणि त्यामुळे कोणतेही सरकार अस्तीत्वात नव्हते. त्यानंतर आम्ही आमचे ४० आणि भाजपचे १०६ आमदारांच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे विरोधकांनी उगाच अकलेचे तारे तोडू नयेत असही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आरोपी नार्वेकरांना भेटले असा आरोप केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ” हा गुन्हागारी खटला नाही दिवाणी खटला आहे त्यात कोणीही आरोपी नसतो. मुख्यमंत्री राहीलेला व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्य कशी करु शकतो. पराभवाच्या भीतीने ते अशी वक्तव्य करत आहेत”.
राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय घडले ?
राहूल नार्वेकर आपल्या अधिकृत गाडीतून आले होते ते अंधारात लपून छपून आले नव्हते. राहूल नार्वेकर हे आमदारही आहेत आपल्या मतदारसंघातील विकासकामांचीही त्यांच्यावर जवाबदारी आहे. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते आले होते. अस मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. विरोधकांना पराभव समोर दिसत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. असही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर हिवाळी अधिवेशनावेळी मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते. राहूल नार्वेकर बुधवारी १० जानेवारीला संध्याकाळी चार वाजता यावर निकालाचे वाचन करणार आहेत. या निकालावर शिवसेना पक्ष आणि उबाठा गटाते राजकीय भवितव्य अवलंबून आहे. हा निकाल सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे अस राहूल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.