---Advertisement---

विवाहितेचे प्रेमसंबंध; प्रियकराच्या मदतीने संपवलं पतीला

---Advertisement---

पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, घटना लपवण्यासाठी आरोपी पत्नीने पतीचा मृतदेह लटकवून आत्महत्या असल्याचे घोषित केले. ही संपूर्ण घटना इब्राहिमपूरमध्ये घडली असून, या गावातील रहिवासी इंद्रेश कुमार यांचा रुक्मणीसोबत 9 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

प्रदीप कुमार यादव हा तरुण इंद्रेशच्या घरी रोज येत असे. हळूहळू आरोपी रुक्मणी आणि प्रदीप यांच्यात जवळीक वाढू लागली. इंद्रेश त्यांच्या प्रेमात अडथळा बनू नये म्हणून दोघांनीही त्याला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून एक भयानक कट रचून इंद्रेशची हत्या केली. आरोपी पत्नीने आधी पतीला विष दिले आणि नंतर फाशी दिली.

पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ.कौस्तुभ म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment