विवाहित तरुणाच्या निर्णयानं अख्खं गाव हळहळल; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव गावांत आपल्या राहत्या घरात एका विवाहीत तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. अलताफ युनूस पटेल (३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव येथे युनुस पटेल (३८ ) हा तरुणान आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दरम्यान, ३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पटेल याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ सलमान युनुस पटेल यांनी माहिती दिल्याने अक्समात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. अद्याप आत्महत्याचे कारण अस्पष्ट आहे.

पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल वासुदेव मराठे करीत आहे. मयत अलताफ युनुस पटेल याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी केले.