विवोची भन्नाट ऑफर; फक्त दोन हजार मध्ये खरेदी करा फोन

तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। विवो ने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. Vivo ने काही महिन्यांपूर्वी Vivo T2 सीरीज लाँच केली होती. विवोचे लेटेस्ट फोन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर देखील उपलब्ध आहे. पण हा फोन तुम्हाला फक्त अवघ्या दोन हजार रुपये किमतीत मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

विवो कंपनी Vivo T2x 5G विक्रीसाठी बाजारात आणत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन तुम्ही फक्त दोन हजार मध्ये सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. या डिवाइसमध्ये तुम्हाला 50MP प्राइमरी कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. या व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये, ६GB RAM + १२८ GB व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आणि 8GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. 4 GB RAM असलेलं मॉडेल Flipkart वर ११,९९९ रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळत आहे.

जर तुम्हाला हा फोन दोन हजार रुपयांना विकत घ्यायचा असेल, तर ईएमआय हा पर्याय निवडावा लागेल. यामुळे तुम्ही सर्वात कमी किमतीत फोन विकत घेऊ शकता. याशिवाय, बँक ऑफर अंतर्गत या मॉडेल वर हजार  रुपयांची सूट मिळत आहे यामुळे त्याची किंमत १०,९९९ रुपये होईल.