विवो वाय५६ ५जीचा नवा व्हेरिएंट लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। विवो वाय ५६ ५जी फोनचा नवा व्हेरिएंट बाजारात आला असून हा फोन २०२३ च्या सुरुवातीला लाँच केला गेला होता. तेव्हा ह्या स्मार्टफोनमध्ये ८जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज होती. आता नव्या मॉडेल मध्ये कंपनीनं ४जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज दिली आहे. तर आत नवीन Vivo Y56 5G ची किंमत आणि फीचर्स हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

ह्या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप डिजाइनसह येणारी ही स्क्रीन २४०८ × १०८० पिक्सल रिजोल्यूशन आणि ६०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबीची स्टोरेज मिळते. फोनमध्ये 8GB extendable RAM चा सपोर्ट असल्यामुळे रॅम वाढवता येतो. तर स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट पॅनलवर १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी Vivo Y56 5G फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ह्या मोबाइलमध्ये १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे.

ह्या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तुम्ही जे नवीन फोन घेण्यासाठी इच्छुक असाल तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.