विश्वास बसेल का? मतदारांनी चक्क मृत तरुणीला निवडून दिलं

VIral News : उत्तर प्रदेशमधील २५ वर्षीय तरुणीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला. या निवडणुकीत अनेक लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवत तिला मतदान करण्याची तयारी केली.. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधीच तिचा मृत्यू झाला. असले तरी मतदानावर काही परिणाम झाला नाही. लोकांनी तरुणीला भरघोस मते दिली. मतमोजणी करण्यात आली. त्यावेळी तरुणी निवडणुकीत जिंकल्याची माहिती समोर आली. आशिया (पूर्ण नाव माहित नाही) असे तरुणीचे नाव आहे.

आशियाचा मृत्यू २० एप्रिल रोजी फुफ्फुस आणि पोटाच्या आजारामुळे मतदानाच्या काही दिवस आधी झाला होता. उत्तर प्रदेशमधील हसनपूर नगरपालिकेत ३० पेक्षा अधिक वॉर्ड आहेत. या निवडणुकीसाठी १६ एप्रिल रोजी आशियाने अर्ज भरला. आशियाने गेल्या वर्षीच लग्न केलं होते. आशियाचा पती मुंताजीब अहमद असून त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे.

मुंताजीब यांनी सांगितले की, ‘हसनपूर नगरपालिकेच्या प्रभाग १७ मधील सदस्यपद महिलांसाठी राखीव होते. आशियाने याधी कधीही निवडणूक लढवली नव्हती. तरीही आशियाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर आशियाने लोकांशी संपर्क वाढवला होता. तिने तिच्या शांत स्वभावाने सर्वांचे मन जिंकले होते.