विहिरीच्या पैशावरून झाला वाद, एकाची आत्महत्या

Crime News : सोयगाव येथील एका ६० वर्षीय इसमाने शेतातच कीटकनाशक घेवून आत्महत्या केल्याची घटना २० रोजी समोर आली. शेख भैया शेख महंमद (६०, रा. सोयगाव, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, शेतातील सामाईक विहिरीच्या पैशाच्या वादावरून झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने सदर इसमाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रानुसार जरंडी ता. सोयगाव येथे गट क्र-१६० मध्ये फिर्यादीच्या शेतातच एक गट अरविंद राठोड यांनी फिर्यादीच्या चुलत भावा कडून घेतले(खरेदी नाही) होते परंतु या गटातील विहीर ही सामाईक असल्याने  त्या पोटी काही रक्कम देण्याचे ठरलेले होते दरम्यान अरविंद राठोड यांनी शेख भैय्या यास  मंगळवारी (दि.२०) फोन करून सांगितले की पैसे द्यायचे आहे त्यासाठी शेतात बैठक ठेवली आहे परंतु बैठकीतच झालेल्या पैशाच्या वादातून अरविंद राठोड यांनी जमविलेल्या गैरकयद्याच्या मंडळींच्या कडून शेख भैय्या शेख महंमद यांच्यासह शरीफाबी शेख, शफीक शेख ,रफिक शेख या चौघांना आठ इसमांनी लाठ्याकाठ्यानी बेदम मारहाण केली यामध्ये शरीफाबी शेख, रफिक शेक  व शफीक शेख हे तिघे जखमी झाले.

दरम्यान बैठकीतील काहींनी हा वाद मिटविला गेला त्यानंतर कुटुंबासह स्वतः ला झालेली मारहाण शेख भैय्या शेख महंमद (वय६०) यांना सहन न झाल्याने त्यांनी अपमान झाला म्हणून मंगळवारी दुपारी शेतात एका झाडाखाली विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले तातडीने उपचारासाठी सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी बुधवारी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्या वर संतप्त कुटुंबियांनी गुन्हा दाखल करून आरोपी अटकेत घेई पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतल्या मुळे पोलीसांनी तातडीने गुन्हा नोंदवून घेतला आत्महत्या केलेल्या इसमाचा मुलगा शेख शफीक शेख भैय्या(वय३२) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अरविंद राठोड,प्रवीण राठोड,संघपाल सोनवणे,समाधान राठोड,रामसिंग चव्हाण,नितीन चव्हाण,गणेश पवार,विशाल चव्हाण सर्व रा.जरंडी (ता सोयगाव)(सर्वांची पूर्ण नाव नाही) या आठ जणांविरुद्ध गुन्हा रजी क्र-११९/२०२३ भादवी १४३,१४७,३२४,आणि आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी ३०६ ,(३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.छत्रपत्री संभाजीनगर पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया,अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली  तपास सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार,जमादार राजू बर्डे,रवींद्र तायडे,गणेश रोकडे अजय कोळी,दिलीप पवार आदी करत आहे.