तरुण भारत लाईव्ह । १३ सप्टेंबर २०२३। व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ९ मजली टॉवर ला भीषण आग लागून ५० रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्रि हि घटना घडली.
व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये ज्या इमारतीला आग लागली, ती शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी होती. यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. हि आग इतकी भयानक होती कि धुराचे लोळ तसेच धुराचे लॉट मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत होते. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्या मिळाल्या लगेचच स्थानिक यंत्रणांनी बचाव आणि मदतकार्य वेगाने हाती घेतले. त्यामुळे जवळपास ७० नागरिकांना वाचवण्यात यश आले. त्यातील ५४ नागरिकांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान इमारतीला आग लागली त्यावेळी बहुतांश रहिवासी हे घरीच होते. इमारतीला आग का लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. बुधवारी सकाळी आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. अजूनही बचावकार्य सुरु आहे. हि आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.