व्हॉट्सअप मध्ये नवीन धमाकेदार फीचर्स

नवी दिल्ली : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअँप मध्ये तीन नवीन धमाकेदार फीचर्स आले आहेत. तीन फीचर्सपैकी पहिले म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या व्हाट्सअँप ग्रुप कॉलिंगमध्ये आता तब्बल ३२ जणांना आपण समाविष्ट करु शकू. दुसरे म्हणजे यापुढे कुठल्याही व्हाट्सअँप ग्रुपची सदस्यसंख्या १०२४ पर्यंत आपण वाढवू शकता. आणि तिसरे म्हणजे यापुढे व्हाट्सअँपवर आता ट्विटर, फेसबुक सारखे कम्युनिटी पोल्स घेता येऊ शकणार आहेत.

व्हाट्सअँपवर विविध विचारांची देवाण – घेवाण करण्यासाठी व्हाट्सअँप कम्युनिटी नावाचे एक बटन दिले जाणार आहे, त्यातून आपण आपल्याला हव्या त्या लोकांसोबत आपली स्वतंत्र कम्युनिटी तयार करू शकतो. यात पूर्वीसारखेच आपण हवे तेव्हा आपला ग्रुप सोडून जाऊ शकतो, ग्रुप ऍडमिन आपल्याला ग्रुपमधून काढून टाकू शकतो असे नेहमीच्या सर्वच सोयी असणार आहेतच. याशिवाय आपल्याला या व्हाट्सअँपवर आपल्याला हव्या त्या विषयांवर चर्चा करू शकतो.

यातील सर्वात अनोखे फीचर असणार आहेत ते व्हाट्सअँप कम्युनिटी पोल. आपल्याला एखाद्या विषयांवर लोकांचे मत जाणून घ्यायचे असेल तर आपण व्हाट्सअँपवर कम्युनिटी पोल घेऊ शकतो यात आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी १२ पर्याय असणार आहेत. अजूनही हे फीचर नेमके कसे काम करणार आहे याबद्दल कंपनीकडून काहीच सादरीकरण झालेले नाही त्यामुळे हे फीचर नेमके कसे असणार याची उत्सुकता अजून तरी कायम राहणार आहे.