‘व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस’ यूजर्ससाठी येणार नवं फीचर; व्यापारात होणार फायदा

तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। व्हॉट्सअ‍ॅप आजकाल सगळेच वापरतात. याचा वापर संदेश पाठ्वण्यासाठी, फोटो पाठवण्यासाठी, व्हिडीओ पाठवण्यासाठी आणि त्याचप्रकारे व्हिडिओ कॉल करण्यासाठी सुध्दा केला जातो . व्हॉट्सअ‍ॅप नेहमी अपडेट होत असत म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर्स येतच असतात. अशातच मेटा कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आज काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

भारतातील व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस’ वापरणाऱ्या यूजर्ससाठी काही नवीन फीचर लाँच केले असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला व्यापार वाढवण्यासाठी  बहुतांश लोक व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसचा वापर करतात. या लोकांच्या मदतीसाठीच व्हॉट्सअ‍ॅप काही नवीन टूल्स देणार आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी व्हर्चुअली सहभाग नोंदवला होता.

यातील पहिलं फीचर म्हणजे WhatsApp Flows. या माध्यमातून बिझनेसेसना आपल्या चॅट थ्रेडमध्ये अधिक कस्टमाईज्ड अनुभव देऊ शकणार आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, एखादी बँक आपल्या बिझनेस अकाउंटच्या थ्रेडमध्ये ग्राहकांना अपॉइनमेंट बुक करण्याची सुविधा देऊ शकणार आहे. अशा प्रकारे इतर बिझनेस देखील आपल्या ग्राहकांना ठराविक सुविधा चॅट थ्रेडमध्येच उपलब्ध करून देऊ शकतील.

व्हॉट्सअ‍ॅपवर असणारे कित्येक बिझनेस हे आपली क्रेडिबिलिटी ग्राहकांना कळावी यासाठी व्हेरिफिकेशन बॅजची मागणी करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस यूजर्सनाही मेटा व्हेरिफिकेशन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल; असं झुकरबर्ग म्हणाले.

सोबतच व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक फीचर भारतात लाँच केलं आहे. या माध्यमातून ग्राहक एखाद्या कंपनीच्या बिझनेस चॅट थ्रेडमधूनच सेवांसाठी पेमेंट करू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांना दुसऱ्या अ‍ॅपमध्ये जावं लागणार नाही, आणि त्यांना चांगला यूजर एक्सपिरियन्स मिळणार आहे. ही सुविधा यापूर्वी ब्राझील आणि सिंगापूरमध्ये उपलब्ध होती, आता भारतातही ती उपलब्ध करण्यात येणार असल्याचं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने पेयू आणि रेझरपे कंपन्यांसोबत टायअप केलं आहे.