तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। आपल्या ग्रहमालेतील सर्वात सुंदर ग्रह समजला जाणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आला असून. या सुंदर ग्रहाला पाहण्याची संधी खगोल प्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे २६ ऑगस्ट पासून शनी ग्रह पृथ्वीजवळ आला असून अजून पंधरा दिवस हा ग्रह दुर्बिणीद्वारे पाहण्याचे संधी खगोल प्रेमींसाठी राहणार आहे.
जळगाव शहरातील खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी खबर प्रेमींसाठी अद्भुत नजारा पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सतीश पाटील यांच्याकडे असलेल्या दुर्मीनेतून रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत आकाश नजारा हा उघडा डोळ्यांनी पाहता येत आहे. तर दुर्बिणीच्या साह्याने पाहिला तर शनी ग्रहाच्या कडा देखील दिसून येतील.
378 दिवसानंतर शनी ग्रह पृथ्वीच्या कमी अधिक जवळ येत असतो याला अपोझिशन असे म्हणतात. पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य तर विरोधी बाजूला शनी ग्रह असतो. शनी आणि पृथ्वीच्या अंतरात बदल होत असतात. मागील वर्षी 14 ऑगस्ट रोजी शनी पृथ्वीच्या जवळ आला होता. तर पुढील वर्षी पुन्हा 8 सप्टेंबर रोजी शनि पृथ्वीच्या जवळ येणार आहे.