शरद पवारांची तब्बल एक तास चर्चा; भेटीचं नेमकं कारण प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आज अजित पवार गटातील सर्वच नेते अचानक शरद पवार यांच्या भेटील पोहचले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज शरद पवारांची भेट घेण्यामागची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली.

काय म्हणाले फुल्ल पटेल?
आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. वेळ न मागता आम्ही आलो. शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचं कळालं होतं. त्यामुळे संधी साधून आम्ही इथे आलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.