Politics Maharashtra : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ मे रोजी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी अनुपस्थिती होती. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं होत. दरम्यान, यावर खुद अजित पवार यांनी अनुपस्थित राहण्याचं खरं कारण सांगितलं आहे.
२ मे रोजी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन झालं. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर राज्यभर आंदोलनं पेटली. कार्यकर्त्यांनी पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एकच गर्दी करुन त्यांचवर दबाव आणला. शेवटी चार दिवासंनी ५ मे रोजी शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
काय म्हणाले अजित पवार?
आज अजित पवारांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, राजीनाम्याचा विषय संपला असल्याने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. पत्रकार परिषद झाली त्या दिवशी मी माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकलो नाही. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्याच आदेशामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, त्यामुळे पुन्हा वेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.