मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यातच नागालँडमधील राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांकडे बहुमत आहे.
अजित पवार गटाने कालच राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवारांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्याच दरम्यान, नागालँडमधील राष्ट्रवादीचे ७ आमदार अजित पवारांची भेट घेण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयालात भेट घेतली.
ईशान्य भारतातील नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. त्यानंतर हे आमदार शरद पवारांच्या सांगण्यावरुन नागालँडमधील भाजप आघाडीला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिले आहे.