शरद पवारांना दिलासा, अजित पवारांना धक्का; न्यायालयात काय घडलं ?

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने अजित पवार गटाला सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयात नक्की झालं ?
शरद पवार यांच्या याचिकेवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता देण्याच्या भारताच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांच्या याचिकेवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवारांची बाजू मांडली. यावेळी सिंघवी यांनी निवडणूक प्रचारातील काही पोस्टर्स न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ज्यावर शरद पवारांचा फोटो आहे. त्यावर न्यायालयाने, प्रचारासाठी शरद पवारांचा फोटो का वापरता ? अशी विचारणा अजित पवार गटाला केली.

“तुम्ही त्यांचे (शरद पवारांचे) नाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरणार नाही असे बिनशर्त प्रतिज्ञापत्र द्या,” असे सांगत न्यायालयाने अजित पवार गटाला सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, “तुम्ही आता वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्याच्यासोबत न राहणे निवडले आहे. मग त्यांचा (शरद पवार) फोटा का वापरता ?. आता स्वतःची ओळख घेऊन पुढे जा…”