मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेला निर्णय महत्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सत्ताधारी पक्षासाठी तीव्र भूमिका मांडत असल्याचे पवारांनी सांगितले. निकालाची प्रत हाती आल्यावरच त्यासंदर्भात बोलणे योग्य ठरेल.”आपण ज्या पक्षाकडून निवडून येतो, त्या पक्षाचा आदेश महत्वाचा असल्याचा निर्वाळा न्यायालयाने निकालात म्हटले आहे.” असे शरद पवार यावेळी म्हणाले. अजून बरेच निर्णय व्हायचे आहेत, स्पीकरवर न्यायालयाने जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत आता चर्चा नको, असे म्हणत पवारांनी मौन बाळगणे पसंत केले. राजीनाम्याची चर्चा आता नको अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे, स्पीकरर्स हे एक इन्स्टिट्युटशन आहे. याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.