शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस आणि बावनकुळे यांचं मोठं भाष्यं

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊन तास मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी तात्काळ हे आदेश दिले. महाराष्ट्रात अशी धमक्या खपवून घेतले जाणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. गेल्या काही दिवसापासून राज्यात नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत. आता शरद पवार यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह ट्विट करत धमकी दिली आहे. शरद पवार यांना ज्या ट्विटर हँडलवरुन जी धमकी देण्यात आली त्या खात्याची खात्री करुन कारवाई करण्याची आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बावनकुळे म्हणाले की, पवार यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणार्‍याला तत्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. पवारांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी, असे बावनकुळे म्हणाले. धमकी देणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असा प्रकार करणार्‍यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.