मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शरद पवार यावर्षी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शरद पवार यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर किंवा फलक न लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे. परंतू, यावर्षी ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. राज्याच्या काही भागात पडलेल्या दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.