नंदुरबार : शहादा शहरात दोन दिवसाआड दोन मोटरसायकली चोरीस गेल्याची घटना घडलीय. शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पहिल्या घटनेत ७ ऑगस्ट रोजी डोंगरगाव रोडवरील भाऊ तात्या पेट्रोल पंपा जवळून शेतकरी संजय टीला पाटील यांची सुमारे २० हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल क्र. एम एच ३९ के ८४६१ ही अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. १० ऑगस्ट रोजी पुसनद ता. शहादा येथील भाजीपाला विक्रेते कृष्णा जगन्नाथ बागले यांनी आपली हिरो होंडा कंपनीची सुमारे २० हजार रुपये किंमतिची मोटार सायकल क्र. एम एच ३९ आर ८६४८ ही भाजी मार्केटमध्ये उभी केली असता तेथून ती चोरिस गेली आहे.
दोन्ही प्रकरणात शहादा पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरिचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. नि. शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे. शहादा शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरिला जात असून चोरिस गेलेल्या मोटारसायकलिंचा तपास तातडिने लावावा व चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.