नंदुरबार : शहादा शहरात मंदिरावर थुंकल्याच्या कारणावरून दगड फेक झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. यावेळी दोन गटात जोरदार वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहादा शहरातील साडी गल्ली परिसरातून ईदचा जुलूस जात होता. यादरम्यान परिसरात असलेल्या दत्त मंदिरावर थुंकल्या प्रकरणी वाद चिघळला. या कारणामुळे दोन गट एकमेकांसमोर येत भिडले. यावेळी मोठा जमाव चालून आला. संतप्त जमावाने दगडफेक केल्यामुळे पाच ते सहा वाहनांची तोडफोड झाली आहे.
दरम्यान, दगडफेक करत महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.