नंदुरबार : येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.
शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे आयोजित अभिवादन प्रसंगी सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेस राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांशी झुंजत बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष व बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष, विष्णू रामचंद्र जोशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले.
याप्रसंगी रणजीतसिंग राजपूत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानावर माहिती दिली.तसेच विष्णू जोशी यांनी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाच्या राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांनी तर आभार संभाजी हिरणवाळे यांनी मानले. अभिवादन कार्यक्रमास सेवानिवृत्त गटविकास अधिकारी व विजया महिला मंडळाचे अध्यक्ष बी. डी. गोसावी ,सदाशिव गवळी, संजय मोतीराम चौधरी, होमगार्ड अनिल वाघ, कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते.