शारजाहमध्ये 9 मजली टॉवरला आग, दोन भारतीयांसह पाच जणांचा मृत्यू

xr:d:DAFe8DR0y38:2558,j:952935554262566752,t:24040814

संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या शारजाह येथील अल नहदा भागात 9 मजली निवासी इमारतीत आग लागली. या अपघातात 5 जणांना जीव गमवावा लागला, तर 44 जण जखमी झाले. 750 अपार्टमेंट असलेल्या इमारतीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. यातील एकाचे नाव साऊंड इंजिनिअर मायकेल सत्यदास, तर दुसरी मृत महिला आहे. त्यांच्या ओळखीची कौटुंबिक मित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्टी केली आहे.