---Advertisement---

शाळा संचालकाच्या पत्नीवर अत्याचार, मंगळसूत्रही काढून नेले, गुन्हा दाखल

---Advertisement---

देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच शाळेच्या संचालकाच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेच्या संचालकाच्या पत्नीसोबत शेजारी राहणाऱ्या तरुणाने अत्याचाराची घटना घडवून त्याचा व्हिडिओ बनवला. एवढेच नाही तर तरुणाने महिलेचे मंगळसूत्रही हिसकावून पळ काढला. तत्पूर्वी त्याने महिलेला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रानुसार, महिलेचे शाळेचे संचालक पती काही कामानिमित्त बाहेर गेले होते. महिला घरात  एकटीच होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या विकास कुमार या तरुणाने बळजबरीने घरात घुसून महिलेवर अत्याचार केला, यादरम्यान त्याने त्याचा व्हिडिओही बनवला.अत्याचारानंतर त्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावले.

याबाबत कोणाला सांगितल्यास पतीला मारून टाकेन आणि व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर भीतीपोटी महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पतीलाही दिली नाही. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ती सासरच्या घरी गेली असता तिने सर्व प्रकार पतीच्या भावाची पत्नी व सासूला सांगितला. त्यानंतर महिलेच्या पतीलाही हा प्रकार कळला.

यानंतर महिला शाळेच्या संचालक पतीने मंगळवारी पत्नीसोबत जाऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पतीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. एसएचओ अमित कुमार यांनी सांगितले की, महिलेने गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी विकास कुमार याला अटक केली. या महिलेचे जबाब घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील रामगढ चौक पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ही घटना घडलीय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment