शास्त्रज्ञांनी शोधून काढले, पृथ्वीचा शेवट कसा होईल?

तरुण भारत लाईव्ह । १६ मे २०२३ । पृथ्वीचा अंत कसा होईल हे कोणी तुम्हाला कधी विचारले आहे किंवा तुमच्या मनात आले आहे का? लोक सहसा म्हणतात की अंतराळातून एखादा मोठा खडक किंवा उल्का पृथ्वीवर आदळेल, मग पृथ्वीचे अनेक तुकडे होऊन नष्ट होईल. या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञही बराच काळ संशोधन आणि अभ्यास करत होते.  मात्र आता पृथ्वीचा अंत कसा होईल याचा दावा स्वतः तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.  हे नेमकं कसं होऊ शकतं याबद्दल तीन तर्क शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत.

दोन तर्क हे मानवनिर्मित आहेत. पृथ्वीवर एखादा मोठा उलका पिंड आदळल्याने पृथ्वीचा अंत होऊ शकतो. एलियन्स द्वारे करण्यात आलेल्या आक्रमणामुळे पृथ्वीचा अंत होऊ शकतो.  ग्लोबल वार्मिंगमुळे निर्माण होणाऱ्या महाप्रलयामुळे देखील पृथ्वीचा अंत होऊ शकतो. न्यूक्लियर वारमुळे देखील पृथ्वीचा अंत होऊ शकतो किंवा मानवाने निर्मित केलेल्या काही रोबोट हे पृथ्वीचा अंत करू शकतात असा तर्क शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

खगोलशास्त्र अभ्यासक लीना बोकील यांनी म्हटलं आहे की, पृथ्वीचा अंत होण्याची नैसर्गिक कारणे ही फक्त एक – दोनच आहेत. मात्र मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीचा अंत होण्याचा धोका अधिक आहे. असं मत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.