तरुण भारत लाईव्ह । ७ सप्टेंबर २०२३। संगीत विश्वातून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. ग्वाल्हेर घराणाच्या शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध गायिका म्हणून मालिनी राजूरकर जगभरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
मालिनी राजूरकर यांचे बालपण हे राजस्थान मध्ये गेले. अजमेरच्या सावित्री गर्ल्स हाय स्कुल आणि महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं होत. गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. मालिनी राजूरकर यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना २००१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २००८ मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्कारने देखील त्यांना गौरवण्यात आले होते. मालिनी राजूरकर यांच्या निधनानं संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.