तरुण भारत लाईव्ह । २४ सप्टेंबर २०२३। रोज रोज तेच तेच खायचा कंटाळा आला असेल तर शाही पुलाव हा पदार्थ तुम्ही करू शकता. पुलाव हा जवळपास सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. घरच्या घरीच अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही पुलाव करू शकता. तर शाही पुलाव कसा बनवावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
तांदूळ, बटाटा,कांदा, फ्लॉवर, मटार, काजू, गाजर, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मीठ, तेल, पाणी
कृती
सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवा. सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या. पनीर आधीच तळून घ्या. एका कढईत तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. त्यात तेज पान आणि इतर सर्व मसाले चांगले परतून घ्या, त्यात सर्व भाज्या टाका आणि चवीनुसार मीठ टाका. त्यात मिरे पावडर टाका. नंतर पाणी टाका आणि नंतर तांदूळ टाका.तांदूळ शिजले की तुमचा शाही पुलाव तयार.